प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पुणे येथे झालेल्या अपघातात कोल्हापूर येथील रहाणारा आकाश अशोक पाटील (वय 23रा.समर्थ कॉलनी गजानन महाराजनगर,संभाजीनगर) याचा गाडी स्लिप होऊन झालेल्या अपघातात मृत्यू झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की आकाश हा पुणे येथे आयटी सॉफ्टवेअरचा कोर्स करण्यासासाठी पुणे शिकण्यास होता.ता.17/04/2024 रोजी छत्रपती संभाजी महाराज ब्रिजवर गाडी स्लिप होऊन अपघात झाला होता.त्याला पुणे येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्या नंतर पुढ़ील उपचारासाठी डॉ.प्रभु येथे 24 /04/2024 दाखल केले होते.त्यानंतर आज 25 रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार चालू असताना मृत्यु झाला.