स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- अंतर्गत वादातुन रंकाळा येथे झालेल्या खून प्रकरणी फ़रारी झालेल्या सात आरोपीना इस्पुर्ली आणि सायबर चौकातील एकास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.यात राज संजय जगताप (21),रोहित अर्जुन शिंदे (20)निलेश उत्तम माळी (21),गणेश सागर माळी (18),सचिन दिलीप माळी (18),(सर्व रा.डवरी वसाहत,यादवनगर) ,प्रशांत सभाजी शिंदे (रा.बीड शेड ता.करवीर),आकाश आंनंदा माळी (21.रा.बालिंगा ,मुळ गाव जयसिंगपूर) आणि निलेश बाबर याचा अटक केलेल्यात समावेश आहे.सदरचा प्रकार दोन गटातील वर्चस्ववादातुन झाल्याचे सांगून त्यांनी अजय शिंदेला फोन करून वाद मिटवायचा आहे असे सांगून बोलावून घेऊन खून केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे ,सहा.पो.नि.सागर वाघ ,पो.उपनिरीक्षक शेष मोरे ,संदिप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.