तरुणीचा संशयास्पद मृत्यु , आई सह भाऊ पोलिसांच्या ताब्यात.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - शनिवार पेठ परिसरातील वैष्णवी लक्ष्मीकांत उर्फ बाळु पोवार (24) हिचा संशयास्पद मृत्यु झाला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिच्या आईसह भावास ताब्यात घेतल्याचे समजते.

वैष्णवीच्या मृत्युचे अजून स्पष्ट झाले नसून तिच्या अंगावर वळ असल्याने तिचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.वैष्णवी यांचे चप्पल लाईनला व्हरायटी लेदर नावाचे चप्पल दुकान असून ती एका खाजगी बँकेत नोकरी करीत होती.तसेच तिचा चार महिन्या पूर्वी साखरपुडा झाल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post