निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 50 सराईताच्यावर हद्दपारीची कारवाई.

 

प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-येणारयां लोकसभा निवडणुकीत मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्यात यावे आणि गुन्हेगारांसह शहरात सुरु असलेल्या अवैद्य व्यवसायिकांच्यावर जरब बसण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी ठोस पावले उचलली आहेत.

आता प्रर्यत 1939 जणांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून 179 जणांना मतदाना वेळी जिल्हा बंदी करण्यात आली आहे.आता प्रर्यत मटकाकिंग विजय पाटीलसह इंचलकरंजी येथील केसरी टोळी बरोबर 50 जणांना हद्दपार केले आहे.यात आणि दोन टोळ्या पोलिसांच्या रडावर आहेत.मतदानाच्या काळात मतदारांना अवैद्य व्यवसायिकांच्या कडून पैशाचा वापर करून दबाव आणण्याचे प्रसंग उदभवतात.या साठी रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या कडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.या साठी पोलिस प्रशासनाने कडक उपाय योजना करुन प्रतिबंधात्मक कारवाई सारख्या हद्दपार आणि स्थानबद्ध यांचाही समावेश आहे.पोलिस प्रशासनाच्या वतीने 67प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविले जातात.हे प्रस्ताव सध्या प्रलंबीत असून हे प्रस्ताव येत्या काही दिवसांत मंजूर होण्याची शक्यता आहे.आता प्रर्यत 1400 जणांना जानेवारी पासून नोटीस बजावली.तर 1939 जणांच्यावर निवडणुक काळात ही कारवाई करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post