मुलासह वडिलांची गळफास लावून आत्महत्या केली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - गोकुळशिरगांव येथील कणेरी येथे भाड्याने रहात असलेला विठ्ठल बाळासाहेब पाटील (वय37.रा मुळगाव चिकोडी).याने आपल्या चार वर्षे वयाचा मुलगा वेदांत याच्यासह गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच गोकुळशिरगाव पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठविला.याचा तपास गो.शि.पो.ठाण्याचे सहा.पो.नि.दिगंबर गायकवाड करीत आहेत.विठ्ठल हा औद्योगिक वसाहतीत नोकरीस होता.आपल्या पै पाहुण्या सोबत तिरुपतीला जाऊन आला होता.त्याची सासरवाडी शिवाजी पेठेत असल्याने सर्वजण रात्री तेथेच थांबले .सकाळी उठून दोन्ही मुलांना रंकाळा येथे जातो असे सांगून त्याने कणेरी गाठली.वडील आणि लहान भाऊ छताला लटकत असलेले पाहून पप्पा ,पप्पा म्हणत त्याने आपल्या आईला फोन करून याची माहिती दिली.
नातेवाईकांनी सीपीआर आवारात गर्दी केली होती.तेथे वेदांतच्या आईने व आजीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.अंत्यसंस्कारासाठी दोन्ही मृतदेह त्याच्या मूळ गावी नेण्यात आले.बचावलेला विक्रांत यालाही फास देण्याचा विठ्ठलचा विचार होता.छताला तीन फास लटकत असल्याचे पोलिसांनी सांगितले.या घटनेने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.