मयत महिलेच्या हातातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - रंकाळा येथे असलेल्या श्रावस्ती हॉस्पिटल असून या हॉस्पिटल मध्ये शालन सुर्याजी पाटील यांच्या पोटात दुखू लागल्याने त्याना उपचारासाठी दाखल केले होते.उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला होता.दरम्यान त्याच्या हातातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याने याची फिर्याद अजित सुर्याजी पाटील(वय 54.रा.शिवाजी पेठ)  यांनी सोमवारी (ता.1) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पाटील यांच्या आई शालन   सुर्याजी पाटील यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना श्रावस्ती या हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.त्या वेळी त्यांच्या अंगावर सोन्याची कर्णफुले ,पाटल्या ,वेल आणि गोठ होते.त्यांचा उजवा हात सुजल्या मुळे हातातील गोठ नातेवाईकांना काढ़ता आला नाही.उर्वरित दागीने उपचारा दरम्यान काढ़ून घेतले होते.त्याची प्रकृती जास्तच बिघडल्याने त्यातच त्यांचा मृत्यु झाला.

मृतदेह ताब्यात घेताना फिर्यादी पाटील यांना आईच्या हातातील गोठ दिसला नाही.त्यानी या बाबत हॉस्पिटल मधील कर्मचारयांच्याकडे चौकशी केली असता योग्य उत्तर मिळाले नाही.वारंवार विचारुनही एक लाख 20 हजार किमंतीचा गोठ मिळत नसल्याने शेवटी त्यानी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली .या बाबत हॉस्पिटल मधील कर्मचारी वर्गाकडे चौकशी केली जाईल अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post