फ्लोटींग मटेरियल, प्लॅस्टिक व 100 टन मटेरियल नाल्यातून काढले बाहेर
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर ता. 29 : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात मान्सुपुर्व नालेसफाईतून आजअखेर 4262 टन गाळ उठाव करण्यात आला. यामध्ये पोकलॅण्ड मशीनद्वारे आज अखेर 799 आयवा गाळ उठाव करण्यात आला. तर नाल्यातून फ्लोटींग मटेरियल, प्लॅस्टिक व तत्सम 100 टन मटेरियल बाहेर काढण्यात आले आहे. या नाले व चॅनेल सफाईकरीता 2 पोकलँड मशिन, 2 जे.सी.बी., 6 हायवा डंपरद्वारे कामकाज सुरु आहे. याकामी 45 महापालिका कर्मचा-यांची 2 पथके तयार करण्यात आलेली आहेत.
सदर मोहिमअंतर्गत पोकलँड मशिनद्वारे गाडी अड्डा ते लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ते महालक्ष्मीनगर, वर्षानगर ते मनोरा हॉटेल व वाय.पी. पोवार नगर ते हुतात्मा पार्क गार्डन या ठिकाणच्या नाल्यांची स्वच्छता पुर्ण झालेली आहे. तर वर्षानगर ते ॲस्टर आधार हॉस्पिटल, गाडी आड्डा ते सुतारवाडा, जयंती नाला याठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या नालेसफाईची आज अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी खातेप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व क्षेत्रीय अधिका-यांना व उप-शहर अभियंता यांना नाले सफाई व गाळ उठावाबाबत समक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी नाले सफाई करुन गाळ उठाव करण्यात येत आहे अशा ठिकाणी स्थानिक नागरीक व सामाजिक संस्थांनी आपल्या काही सूचना असतील तर त्या आरोग्य विभागाच्या पथकास द्याव्यात. जेणेकरुन सर्वांच्या सूचनेनुसार सफाईचे काम लवकर पुर्ण करता येईल असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी उप-आयुक्त साधना पाटील, सहा.आयुक्त कृष्णा पाटील, संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, वित्त अधिकारी काटे, मुख्य लेखापरिक्षक मिसाळ उपस्थित होते.
महापालिकेच्यावतीने आज अखेर मनुष्यबळाद्वारे 48 प्रभागामधील एकुण 257 चॅनेल्स् सफाई पुर्ण झालेली आहे. तर पोकलँड मशिनद्वारे 13 पैकी 4 मोठे नाले पुर्ण झाले असून 2 ठिकाणी काम सुरु आहे. जे.सी.बी मशिनद्वारे 206 पैकी 96 चॅनेल्स सफाई पुर्ण झालेली असून 799 आयवा अंदाजे वजन 4262 टन इतका गाळ उठाव करण्यात आला आहे. तसेच मनुष्यबळाद्वारे शहरामधील मुख्य ड्रेनेज लाईन (मॅनहोल) 2200 पैकी 944 ड्रेनेज लाईनचे सफाईचे काम पुर्ण झाले आहे. ही नाले व चॅनेलची सफाई शाहु कॉलनी, ग्राऊंड शेजारील चॅनेल, कदमवाडी रोड चॅनेल, संकपाळ नगर, पॅव्हेलियन ग्राऊंड लगत, कागलवाडी चॅनेल, कामगार चाळ, काळपे हॉस्पिटल मागील बाजू, भोसले पार्क, कोरगावकर हायस्कुल, बेकर गल्ली, जिल्हापरिषद मागील बाजू, बेडेकर चॅनेल, घोरपडे गल्ली, संगम टॉकीज,संजय गांधी हौसिंग सोसायटी, सनराईज अपार्टमेंट मागील बाजू, काटे मळा, लोणार वसाहत, रेल्वे लाईन माकडवाला वसाहत, साईक्स एक्टेंशन, शाहुपूरी मार्केट, पेरीना चॅनेल, पोलीस लाईन चॅनेल, हाबळे चॅनेल, पेरुची बाग, बुरुड गल्ली, हत्ती महाल, ताईबाई गल्ली, कोटीतीर्थ समोरील चॅनेल, डवरी वसाहत, जगदाळे हॉल, शनि मंदीर चॅनेल, कामगार भवन, एस.टी. कॉलनी, सायबर कॉलेज रोड, पंचगंगा बँक समोरील चॅनेल करण्यात आली आहे. शहरातील उर्वरीत सर्व नालेसफाईचे कामकाज दि.31 मे 2024 पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
जयंती नाला पंपींग स्टेशन, सुतारवाडा, कल्याण ज्वेलर्स या
परिसरातील नाल्यातून 1200 टन गाळ उठाव
जयंती नाला पंपींग स्टेशन, सुतारवाडा, कल्याण ज्वेलर्स या परिसरातील नाल्यातील पढलेले मोठया वृक्ष व गाळ मोठया संख्येने बाहेर काढण्यात आला आहे. यामध्ये साधारणत: 1200 टन गाळ व 15 आयवाद्वारे प्लॅस्टीक बाहेर काढण्यात आले आहे. या ठिकाणी रोज सहा.आयुक्त कृष्णात पाटील हे भेट देत असून हा गाळ काढल्याने येथील स्थानिक नागरीक व व्यपा-यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या ठिकाणी नाल्याच्या परिसरात टाकलेले इतर मटेरियल काढणेसाठी संबंधीत व्यपा-यांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.