कोल्हापूर महानगरपालिकेच्या काही विभागाच्या विविध प्रकरणाच्या फायली मंजूर करून घेऊन काही कर्मचारी मालामाल.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - एकीकडे कोल्हापूर महानगरपालिकेत प्रत्येक विभागात महसुल गोळा होत नसल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या कडुन त्या-त्या विभागाच्या संबंधिताना वेठीस धरले जात आहे.तर काही वेळा त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे समजते.पण ज्या वेळी कुंपणच शेत खात असल्याने तेरी भी चुप मेरी भी चुप असे काहीच्या कडून घडत आहे.यात एकाची ऑर्डर कर्मचारी म्हणून पण त्याचा रुबाब  एखाद्या अधिकारी असल्याचा .त्याची उठ बस काही वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत असल्याने तो कर्मचारी हम करे सो कायदा या पध्दतीने वावरत आहे.त्या कामगाराने नोकरीस लागल्या पासून आज अखेर ज्या विभागाकडे कामगार म्हणून ऑर्डर झाली त्या ठिकाणच्या हजेरी पत्रिकेवर सह्याच न केल्याची माहिती मिळाली असून असे अनेक कर्मचारी आपल्या सोयीच्या ठिकाणी काम करीत   असल्याचे समजते.

काम कसले फक्त पंचिंग करून घरी जाऊन आपला दुसरा उद्योग करत असतात.त्या बदल्यात संबंधितांना ठराविक रक्कम दिली  जात असल्याचा प्रकार घडत आहे.एखाद्या नागरिकांची कामे होत नसल्यास उदा.घरफाळा कमी करुन घेणे ,एखादा कर जास्त आला तर संबंधिता कडून कमी करुन घेणे तसेच नवीन बांध काम परवाना कोणाला पाहिजे असेल तर असे सावज हेरुन अर्ज करण्यापासून ते मंजूर करून घेई पर्यन्त त्याच्या ओळखीच्या बळावर पाठ पुरावा करीत असल्याचे काहीनी सांगितले त्या बदल्यात गरजू नागरिकांच्या कडुन आर्थिक लाभ करून त्यात कामे केलेल्या काहींना यातला वाटा देऊन आपला स्वार्थ साधत असतो.याच्यामुळे काही काम न करता फुकटचा पगार घेत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत असते.

काही प्रामाणिकपणे काम करणारे भर उन्हातान्हात ,थंडी ,वारा ,पाऊस याची कशाची तमा न बाळगता काम करीत असतो.पण एखाद्या वेळी  कामात कसुर दिसला की वरिष्ठांच्याकडुन खडे बोल सुनावले जातात तर काही वेळा दंडात्मक कारवाई केली जाते.मग अशा वेळी फक्त पंचिंग करून काम न करण्यारयावर कारवाई का होत नाही असे काही कर्मचारी  वर्गातुन बोललं तरी आहे.असे काही कर्मचारी आपल्या संबंधिताना महिण्याला काही ठराविक रक्कम मिळत असल्याने अशा कामगारांना पाठीशी घालत असल्याचे सध्याची स्थिती आहे. त्या कामगाराचे सध्या गेल्या एक दोन महिन्यापासून  कामा पेक्षा एका नागरिकांची फाईल मंजूर करून घेण्यासाठी नगर रचना विभागात येरझारयां चालू असलयाचे चित्र असून त्या विभागातील काही जण आपला लाभ उठवत ह्या टेबला वरुन त्या टेबलावर त्याचे काम गेल्याचे दिसून येते . 

अशा कर्मचारी वर्गाची वरिष्ठ अधिकारी यांनी यात लक्ष घातले तर बऱ्याच बेकायदेशीर गोष्टी बाहेर येतील.जर एखाद्या भागात कर्मचारी कमी असतील तर त्या वेळी दुसरयां भागातील कर्मचारी यांच्या कडुन स्वच्छता करून घेतली जाते.हे कर्मचारी काही न बोलता सांगितलेला भाग करून मग आपल्या भागात कामे करत अ सतात.जर एखाद्या कर्मचारयांने आपला भाग होण्या अगोदर दुसरया भागाचेही काम करण्यास नकार दिल्यास संबंधिता कडुन कारवाईची भिती दाखवून त्या दिवसाची हजेरी न मांडण्याची धमकी दिली जाते.

जर एखादा कामगार पंचिंग करण्यास उशिरा गेला आणि त्याची पंचिंग झाली नसल्यास त्या  कामगारांचा वरिष्ठ त्या कर्मचारयां  कडुन लाभ होत असल्याने त्याची   हजेरी एक दोन दिवसांनी मांडत असल्याची माहिती एकाने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.असे जर प्रकार घडत असतील तर पंचिंगची सक्ती करायचीच कशाला असे काहीनी बोलून दाखविले .अशा बेजबाबदार कर्मचारी वर्गावर कारवाई होईला का ? अशी विचारणा होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post