इंचलकरंजी शिवाजीनगर पोलिसांची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
इंचलकरंजी - इंचलकरंजी येथील पैशाच्या तगाद्याला कंटाळुन बाळु कांबळे (वय 62) यांनी आपल्या अंगावर सावकराची नावे लिहून 18 एप्रिल रोजी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती.या प्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातुन भिकाजी कृष्णा चौगुले(वय 38.रा.दत्तनगर ,कबनूर )दत्तात्रय मधुकर मुदगल (वय 42.रा.भोने मळा).यांना अटक करून त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना 25 एप्रिल प्रर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणातील आणखी तिघे संशयीत असून ते फरार झाले आहेत.त्याची नावे प्रमोद शिंगे ,रामदास जाधव आणि अभिजीत सुतार अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की मयत बाळु हा त्यांच्याकडे मटका घेण्यास कामाला होता.यात देणी देण्याच्या वारंवार होणारया त्रासाला कंटाळुन आपल्या अंगावर काही सावकरांची नावे लिहून झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती.याचा पोलिस तपासात उघडकीस आले.या प्रकरणी त्याची पत्नी कामिनी बाळू कांबळे(वय 50.)यांनी फिर्याद दाखल केल्याने प्रमोद शिंदे,भिकाजी चौगुले ,दत्तात्रय मुदगल ,अभिजीत सुतार आणि रामदास जाधव यांच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.याचा तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक पुनम माने यांनी करुन वरील कारवाई केली.
गेल्या काही दिवसांपासून हे पाच जण बाळु कांबळे पैसे देण्यासाठी वारंवार तगादा लावत त्रास देत होते.या त्रासाला कंटाळून आपल्या अंगावर या सर्वाची नावे लिहून आत्महत्या केल्याने पोलिसांनी भिकाजी चौगुले आणि दत्तात्रय मुदगल यांना अटक केली.यातील तिघांचा पोलिस शोध घेत असल्याचे पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी माहिती दिल्याचे सांगितले.जरी यात पाच जणांची नावे समजली असली तरी यात अनेक जण गुंतल्याने या अवैद्य व्यवसायकांनी चांगलाच धडा घेऊन काही जण पसार झाले आहेत.या प्रकरणात अधिक व्याप्ती वाढ़ून या तपासाचे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान असंणार आहे.