प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-करवीर तालुक्यातील क.ठाणे येथे महाडिकवाडी येथील रंगराव बाळासो पाटील (वय 28.).याने आज दुपारी च्या रहात्या घरी सिंलीग पंख्याला नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना वडीलांना समजताच गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.अधिक माहिती अशी की,रंगराव फाटक हा सैन्य भरती साठी तयारी करत असतानाच पोलिस भरतीची तयारी केली होती .पोलिस भरतीची वाढ़ीव मुदत आज शेटवचा दिवस असल्याने मुदतीत कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने या नैरेशेतुन त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.तो अविवाहित असून शिक्षणाबरोबर वडीलांना शेतीत मदत करीत होता. त्याला एक मोठा भाऊ असून त्याचे गावात एस.ट्रेडिंग नावाचे दुकान आहे.त्याने आपल्या मित्रांना ही माझी शेवटची संधी असल्याचे सांगितले होते.त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.