प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील कोथळी येथील सानिका संभाजी कुंभार (वय 22.रा.कोथळी) हिने 29/04/24 रोजी सकाळी 9 च्या सुमारास रहात्या घरात किचन मध्ये दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.तिचा नातेवाईकांच्या हा प्रकार लक्ष्यात येताच तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार चालू असताना तिचा मृत्यु झाला.
याची फिर्याद संतोष गणपती कुंभार यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली असून या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
अधिक माहिती अशी की ,सानिका ही कुरुकली येथे महाविद्यालयात बी.कॉम.मध्ये शिकत होती.तिला परिक्षेत 75 % मार्कस पडले होते.तिचे त्याच परिसरातील तरुणाबरोबर प्रेम संबंध होते.सानिका हिने त्या तरुणाकडे लग्ण करण्याचा तगादा लावला असता सदर तरुणाने सानिका लग्नास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याने घरात कोणी नसताना आत्महत्या केल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगीतले.ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाल्याने संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी केली.