प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - येणारी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने जिल्हयात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी जिल्हयातील सर्वच पोलिस ठाण्यांना रेकॉर्डवरील गुन्हेंगारांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुशंनाने जिल्हयातील पोलिसांनी रेकॉर्डवरील 63 गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करून वरिष्ठाना पाठविले असता त्या प्रस्तावाची पडताळणी करून 63 पैकी चौघांना हद्दपार केले.यात कोल्हापूर शहरातील दोघांचा आणि इंचलकरंजी येथील दोघां जणाचा समावेश आहे.
हद्दपार केलेल्यात प्रदिप शिवाजी कांबळे (वय32 रा.सहकार नगर ,को.)याला दोन वर्षे हद्दपार केले असून इंचलकरंजीतील राजेश कृष्णात कुंभार (वय 51.रा .सोलगे मळा,इंचलकरंजी) याला एक वर्षे तर प्रेम राजू आवळे (वय 23.भाग्यरेखा टॉकीज समोर ,इंचलकरंजी ) याला दोन वर्षे हद्दपार केलेल्यात समावेश आहे.
ही कारवाई उपविभागीय दंडाधिकारी इंचलकरंजी विभाग आणि उपविभागीय दंडाधिकारी करवीर विभाग यांनी केली आहे. हद्दपार झालेले कोल्हापूर जिल्ह्यात आढ़ळल्यास त्याची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावी .असे आवाहन पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी केले आहे.