प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- मध्यवर्ती एसटी स्टँडवर एसटी मध्ये चढ़त असताना.सुशीला विष्णु चौगुले (वय 61.उंबरवाडी ,ता.गडहिंग्लज) यांची 14 तोळे दागीने आणि 200/रु.असलेली पर्स चोरट्यांनी हातोतात लंपास केल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी (ता.27)रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली असून याची फिर्याद सुशीला चौगुले यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
अधिक माहिती अशी की,सुशीला चौगुले या गावी जाण्यासाठी एसटी स्टँडवर थांबल्या होत्या.गर्दीत अंगावरील दागिन्यांची चोरी होऊ नये म्हणून त्यांनी सर्व दागिने काढ़ुन पिशवीत ठेवले होते.गडहिंग्लज एसटीत चढ़ताना चोरट्यांनी पिशवीत ठेवलेली पर्स लंपास केली.यात सोन्याची चेन,दोन हार ,ब्रेसलेट आणि गंठणसह 200/ रु.रोकड होती.काखेत पिशवी अडकवून त्या गर्दीत एसटीत चढ़त होत्या.त्याच वेळी चोरट्यांनी हातचलाखीने पर्स लंपास केली.एसटीत बसल्यानंतर हा प्रकार लक्ष्यात आला.त्यांनी लगेच एसटीत आणि एसटी स्टँडवर दागीन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर त्यानी शाहुपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.या वारंवार घडत असलेल्या चोरीच्या घटना घडत असतानाही पोलिसांना चोरटे सापडत नसल्याने प्रवाशांच्यात नाराजी व्यक्त केली जात आहे.