अश्लिल मेसेज पाठविल्या प्रकरणी तरुणास 24 तासात सायबर पोलिस आणि निर्भया पथकाने मुसक्या आवळल्या.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर जाधव :

कोल्हापूर -एका अनोळखी तरुणीला अश्लिल मेसेज करून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देणारा अमरनाथ कृष्णा दप्तरदार (वय 22.रा.केआयटी कॉ.प्लॉट नं.36 गोकुळशिरगाव ) याला सायबर पोलिस आणि निर्भया पथकाने ताब्यात घेतले.या प्रकरणी तरुणीने ता.14/04/24 रोजी सायबर पोलिस ठाण्यात NCCRP वर फिर्याद दिली होती.या पथकातील पोलिसांनी आरोपीची तांत्रिक माहिती घेतली.या माहितीच्या आधारे आरोपी अमरनाथ दप्तरदार कलेक्टर ऑफिसच्या परिसरात येणार असल्याचे माहिती मिळाली असता दोन्ही पथकाच्या पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

तरुण -तरुणींनी आणि महिलांनी आपले फोटो आणि माहिती शेअर करताना खबरदारी घ्यावी. तसेच अनोळखी व्यक्तीच्या रिक्वेस्ट खात्री केल्या शिवाय स्विकारु नये .असे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी सांगितले. सध्या सोशल मिडीयावर रिल्स आणि पोस्ट शेअर करण्याच्या प्रकरणात वाढ़ झाली असून अशा पोस्ट मुळे  कोणाच्याही खाजगी पणाचे उल्लंघन होत असल्यास किंवा सोशल मिडीयावर पोस्ट टाकण्याची धमकी देत असल्यास 112 वर  किंवा निर्भया पथकाशी संपर्क साधावा असे पोलिसांच्या कडुन सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post