मांडीत गोळी लागल्याने एक जखमी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -जवाहरनगर परिसरातील यादव कॉलनी येथे झालेल्या गोळीबारात साद शौकत मुजावर (वय 29.रा.यादव कॉलनी,सरनाईक वसाहत) यांच्या मांडीत गोळी लागल्याने जखमी झाला आहे. त्याच्या मित्राने दुचाकीवरुन उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या बाबतची फिर्याद शौकत चॉदसाहेब मुजावर यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली आहे.
साद हा आपल्या मित्रा सोबत जेवण करून घरा जवळ बसला होता. त्या वेळी चार चाकीतुन सद्दाम मुल्ला ,मोहसीन मुल्ला ,मनिष नागोरी ,मुजबिन कुरणे ,इमाम हुसेन कुरणे आणि तौफिक कुरणे अशी गोळीबार आणि डोक्यात शस्त्राने वार करून जखमी केलेल्या संशयीताची नावे असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे ,शहर डिवायएसपी अजित टिके यांनी घटना स्थळी भेट दिली.सीपीआर आवारात मोठी गर्दी झाली होती.सीपीआर रुग्णालयातही शहर डिवायएसपी यांनी भेट देऊन आपल्या सहकारयांना सूचना दिल्या.साद हा गाड्या खरेदी -विक्री आणि जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता.साद याला प्रथम सीपीआर रुग्णालयात दाखल करून पुढ़ील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले.