प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - इंगळी येथील पुनम दिलीप ढ़ेंगे (वय 25.रा.नवीन वसाहत,इंगळी) हिने आपल्या मित्रांच्या मदतीने मुलगी संस्कृती (वय.1वर्षे).हिला गोवा येथील वास्तव्यास असलेल्या फर्नाडिस आणि जेरी नोरोन्हा यांना एक लाखाला विकल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
या बाबतची फिर्याद तिचा पती दिलीप विलास ढ़ेंगे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी त्याची पत्नी पुनम दिलीप ढ़ेंगे हिच्यासह सचिन आण्णाप्पा कोंडेकर (वय 40.रा.शहापूर बालाजीनगर ,इंचल .),किरण गणपती पाटील (वय.30.रा.केर्ली ,ता.करवीर),श्रीमती फातीमा फर्नाडिस आणि जेरी पॉल नोरोन्हा (वय.44.दोघे.रा.243 चर्च जवळ न्युरा ,उत्तर गोवा.).यांच्या विरोधात गु न्हा दाखल करून पीडीत मुलीच्या आईसह तिघांना ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की,इंगळी येथे रहात असलेले दिलीप आणि पूनम पती पत्नी असून त्यांना एक वर्षाची संस्कृती नावाची मुलगी आहे.पती आणि पत्नीत गेल्या एक वर्षा पासून कौटुंबिक वाद असल्याने पुनम ही आपल्या लहान मुलीसह माहेरी आपल्या आईकडे रहात होती.ता.27/03/2024 रोजी 3 ते 5 या दरम्यान तहसीलदार कार्यालयाच्या आवारात घरी कोणाला न सांगता स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मित्रांच्या मदतीने गोवा वास्तव्यास असलेल्या फातीमा फर्नाडिस आणि जेरी नोरोन्हा यांना मुलीला एक लाखांत विकल्याची घटना घडली आहे.याची माहिती तिचा पती दिलीप ढ़ेंगे यांना समजताच त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी या सर्वावर गुन्हा दाखल करून मुलीच्या शोधासाठी गोवा येथे पोलिस पथक रवाना झाले.या गुन्हयाचा तपास लक्ष्मीपुरीचे महिला सहा.पो.नि.रुपाली पाटील करीत आहेत.