प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - महिला अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती किर्ती धनाजी देशमुख (रा.कांरडे मळा,ताराबाई पार्क,मुळ गाव मोहोळ,सोलापूर ) यांना 25 हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून कारवाई करुन त्यांच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी श्रीमती देशमुख यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
श्रीमती देशमुख यांनी तक्रारदाराकडून एक लाखाची मागणी करत त्यात तडजोड करून 70 हजार रुपये देण्याचे ठरले होते.त्यातील पहिला हप्ता 25 हजार रुपये श्रीमती देशमुख यांनाही रहात्या घराच्या पार्किंगच्या आवारात घेताना लाचलुचपतच्या पथकाने कारवाई करून ताब्यात घेतले होते.पोलिसांनी त्यांच्या घराच्या झडतीत साडेतीन तोळ्याचा डांयमंडचा हारासहित 80 तोळे सोन्याचे दागिने आणि काही रक्कम तसेच कार मिळुन आल्या होत्या त्या जप्त केल्या आहेत.