प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - एटीएम कार्डाची अदला बदल करून दिड लाखांचा गंडा घालणारा सोनुकुमार पंचानंद सनगही (वय 28.रा.अमरपूर ,बिहार ) या परप्रांतीयास फिर्यादी आणि नागरिकांनी त्याचा शोध घेऊन शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.पोलिसांनी या संशयीतावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की,वन विभागातील कर्मचारी भिकाजी कृष्णा देवणे (वय 58.रा.तांदुळवाडी) हे सोमवारी(ता.22) रोजी बसंत - बहार टॉकिज परिसरात असलेल्या ट्रेझरी मध्ये पैसे काढ़ण्यासाठी गेले होते.त्या वेळी एटीएम मध्ये असलेल्या तरुणाने दोन पैकी एक म मशीन बंद असल्याचे सांगून त्या नंतर पैसे काढ़ण्यासाठी मदत करतो असे सांगत देवणे यांचा पासवर्ड पाहून बाहेर पडताना देवणे यांचे एटीएम कार्ड घेऊन हात चलाखीने दुसरे कार्ड दिले.
दुसरया दिवशी देवणे यांनी बँकेत जाऊन पासबुक भरुन घेतल्या नंतर खात्यातील पैसे कमी झाल्याचे लक्षात आले.या बाबत बँकेत विचारले असता विविध ठिकाणाहुन एटीएम मधुन पैसे काढ़ुन ऑनलाईन खरेदी केल्याचे लक्ष्यात आले.खिशातील एटीएम कार्डाची तपासणी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे समजले.त्यानी या बाबत आपल्या मित्रांना याची माहिती देऊन स्वत:ही शोध घेत असताना बुधवारी दुपारी कागल येथे एका पेट्रोल पंपावर आल्याची माहिती देवणे यांना एका मित्राने दिली असता देवणे हे कागल येथे जाऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात एटीएम कार्ड मिळाल्याने त्याला शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली.अधिक माहिती सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिली.