प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या शेतातुन ट्रॅक्टर चोरी करणारा सचिन काकासो पाटील (वय 28.रा.हलसवडे ,ता.करवीर ). याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडून त्याच्या ताब्यातील पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर आणि महिंद्रा बोलेरो गाडी असा 7 लाख 25 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून पुढ़ील तपासासाठी गोकुळशिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
अधिक माहिती अशी की,हलसवडे येथील शेतकरी महेश शिंवगोंडा पाटील यांच्या शेतातुन पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर चोरी झाली होती.त्यांनी याची फिर्याद गोकुळशिरगाव पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक आणि गो.शिरगाव पोलिस यांनी एकत्रीत तपास करीत असताना रेकॉर्ड वरील सचिन काकासो पाटील यांनी केली असून तो पिंपळगाव येथे मामाच्या गावी कागल ते मुरगुड रोड वरुन जाणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा ट्रयक्टर चोरीचा असल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करून 7 लाख 25 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला .
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर , सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.