प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - चित्रनगरी परिसरात अनोळखी चौघांनी येऊन चाकू हल्ला करून त्यात यश कृष्णात बारड (वय 19 रा.कोगनोळी) जखमी झाला आहे.या बाबतची तक्रार सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,यश बारड हा आपल्या दुचाकी वरुन कोल्हापूरकडे येत असताना चित्रनगरी परिसरात आला असता त्याला अनोळखी चौघांनी अडवून त्याचा फोटो दाखवून हा तुच का म्हणत अचानक चाकूने हल्ला करून त्याच्य उजव्या ,डाव्या दंडावर आणि पाठिवर ,छातीवर वार करून जखमी करुन पळुन गेले .
ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली असून त्याला सीपीआर रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.मारणारे अनोळखी व्यक्ती असून पण मला मारण्यास सांगणारा कोगनोळी येथील वडर या आडनावाच्या पाठविल्याची शक्यता बोलून दाखवली.त्याचे त्याच गावात मुली बरोबर प्रेम होते.पण दोन्ही कुंटुबांनी हा विषय मिटविल्याचे यश बारड यांने सांगितले.वडर हा यश ला वरचेवर धमकी देत असल्याचे सांगितले त्यावरुन हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.यश कपडे खरेदी साठी कोल्हापूराकडे डी मार्ट ला येतं होता पण लक्ष्मी टेकडी जवळ त्याच्याकडे लायसन्स नसल्याने वहातुक पोलिसांनी पावती केल्याने तसाच पूढ़े येऊन ही घटना घडली.