प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
वाठार - वाठार येथील अर्जुन सर्जेराव दबडे (वय 23.रा.साखरवाडी ,वाठार तर्फ वडगाव) याने 23/04/2024 रोजी रात्री 8च्या सुमारास रहात्या घरी क्लोरोफारीफॉस नावाचे औषध पिल्याने त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . आज त्याचा 26/04/2024 रोजी आयसीयु विभागात उपचार चालू असताना मृत्यु झाला.
या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे..यातील मयत याने 23/04/24 रोजी रात्री 8 च्या सुमारास रहात्या घरात क्लोरोफारीफॉस नावाचे औषध पिले होते.त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या बाबतची फिर्याद त्याची बहिण शुभांगी सतीश अवघडे यांनी ता.24/04/24 रोजी सीपीआर पोलिस चौकीत दिली होती.त्याच्यावर आयसीयु विभागात उपचार चालू असताना आज त्याचा मृत्यु झाला.अर्जुन हा विवाहित असून त्याला दोन लहान मुले आहेत.त्याच्या वडीलाचे चार महिन्या पूर्वी निधन झाले असून त्याच्या वडीलांनी गावातील व्यक्तीला 1 कोटी 20 लाखाला शेती विकली असून त्यातील व्यतीने 50 ते 60 लाखांला फसविल्या मुळे अर्जुन यांने हा प्रकार केल्याचा त्याचे चुलते सुरेश शामराव दबडे (रा.वाठार) येथे सांगीतले.
तसेच सीपीआर मधील आयसीयु विभागातील डॉक्टर आणि सिस्टर यांनी मयताला गुंडाळण्यासाठी नवीन चादर आणि नवीन शर्ट आणण्यास सांगीतले हे कशासाठी कारण कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करून पांढ़रयां कापडात गुंडाळुन दिले जाते.तर चादर आणि शर्ट कशासाठी अशी विचारणा केली असता त्यानी योग्य माहिती दिली नसल्याचे मयताचे चुलते सुरेश शामराव दबडे (मो.नं.9960550172) यांनी सांगितले.