प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - महिला अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती किर्ती धनाजी देशमुख (वर्ग-2 ,रा.कांरडे मळा,ताराबाई पार्क ,मुळ गाव मोहोळ, सोलापूर) यांना 25 हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने ताब्यात घेतले.
अधिक माहिती अशी की,यातील तक्रारदार हातकंणगले तालुक्यातील किणी येथे सम्राट फुडस नावाचे हॉटेल आहे.महिला अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती किर्ती देशमुख या ता.15/03/2024 रोजी या हॉटेलात तपासणी साठी गेल्या होत्या.त्या वेळी अन्न पदार्थांचे काही नमुने चाचणीसाठी घेतले होते.या अन्न पदार्थात रंग मिलावट असल्याचे कारण सांगून तुमच्यावर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाखांची लाचेची मागणी केली होती.
यात तडजोड करून 70 हजार रुपये देण्याचे ठरविले .यातील तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला माहिती दिली असता या विभागाने याची खात्री करून . आज ता.26/04/2024 रोजी त्यांच्या रहात्या घराच्या पार्किंगच्या आवारात पहिला हप्ता 25 हजार रुपये घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले .या पथकाने श्रीमती देशमुख यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
ही कारवाई लाचलुचपत पथकाचे पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे,पोलिस उपनिरीक्षक बंबरगेकर ,स.फौ .भंडारे ,महिला पोलिस कॉ.पूनम पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.
जर कोणी आपल्याकडे लाचेची मागणी करत असल्यास त्यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा किंवा 0231-2540989 .या नंबर वर संपर्क साधावा.असे आवाहन केले आहे.