प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -प्रियकराशी लग्ण कर किंवा त्याचा नाद सोड म्हणुन वैष्णवी पोवार हिला तिच्या आईसह भावाने आणि मामाने मारहाण केल्या वेळेस उपस्थितीत असलेला रुणाल उर्फ बालाजी प्रताप डिसले (वय 26.रा.तासगाव जि.सांगली) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवार (ता.15) अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवार प्रर्यत (ता.19) पोलिस कोठडी सुनावली आहे.
या अगोदर वैष्णवीची आईसह तिचा भाऊ आणि मामा हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.यातील संशयीतांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी बँकेशी पत्रव्यवहार करून माहिती घेत असल्याचे सांगितले.हा मारहाणीचा प्रकार पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे असलेल्या मठात घडला होता.त्या वेळी सेवक म्हणून कार्यरत असलेला रुणाल उर्फ बालाजी डिसले हा वैष्णवीला मारहाण होताना उपस्थित होता.ज्या वेळी वैष्णवी बेशुध्द पडली त्या वेळी पहाटेच्या सुमारास गावाकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी तासगावला जाऊन डिसले याला अटक केली.या गुन्हयात त्याचा कितपत सहभाग होता याचा पोलिस शोध घेत असल्याचे सांगितले.
========वैष्णवीचा खून कोणत्या कारणासाठी झाला याचा तपास करीत असून तिच्या नातेवाईकांच्या मिळकतीची माहिती मागविली असल्याचे सांगून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बँकेशी पत्रव्यवहार केला असून लवकरच त्यांच्या खाते असलेल्या व्यवहाराचा तपशील मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
=====या गुन्हयातील मुख्य संशयीत बाळकृष्ण महाराज व महेश महाराज यांच्या अटकेची मागणी वैष्णवी पोवारच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कडे केली असल्याचे सांगून या दोन महाराजांनी केलेल्या प्रकरणाची माहिती देऊन मठाची आणि महाराजांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले.