पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्प सभेत प्रतिपादन.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर जाधव :
कोल्हापूर -भाजप विकसित भारत करण्यासाठी लढ़त असून विरोधी गट या विरोधात लढ़त असून त्यांना 370 हे कलम परत आणायचे आहे.असे कोल्हापूर आणि हातकंणगले लोकसभा उमेदवाराच्यां प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत करून सर्व महापुरुषांना अभिवादन करून कोल्हापुरच्या अंबाबाईला वंदन केले.माझे भाग्य हे की मी काशीचा असून मला करवीर काशीत येण्याचा योग आला .त्यांनी सुरुवाती पासूनच विरोधकावर फुटबॉलचे उदाहरण देऊन हल्ला बोल चढ़विला .कारण कोल्हापुरातली युवा पिढी फुटबॉल प्रेमी असल्याने त्यांनी फुटबॉलच्या रुपात जमलेल्या जनसमुदायाला प्रेरीत केले.येत्या 7 तारखेला विरोधकांना कोल्हापूरकर गोल करून चारी मुंड्या चित करतील असे मत मोदी यांनी बोलून दाखवले.कॉग्रेसने पहिल्या पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला.तरी सुध्दा त्यांचे सुपुत्र कॉग्रेसचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत.अशी टीका केली.या निवडणुकीत संजय मंडलीक आणि धैर्यशील माने यांना मत म्हणजेच मोदीना मत असल्याचे सांगितले.आपल्याला आईचे दु:ख विसरून जनतेसाठी राबणारा पंतप्रधान पाहिजे आईचा पदर पकडून राजकारण करणारा पंतप्रधान नको अशी टीका राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.या वेळी मंच्यावर उपस्थित असलेल्या विविध मान्य्ंवरांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री हसनसो मुश्रीफ ,उदय सांमत,चंद्रकांत दादा पाटील,खा.धनंजय महाडिक ,प्रकाश आवाडे ,रामदास आठवले,प्रकाश आबिटकर ,राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही आपल्या भाषणात कोल्हापूरच्या आणि हातकंणगलेच्या या दोन्ही उमेदवाराना निवडून देऊन तिसरयांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करुया .असे प्रतिपादन केले.या वेळी विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.