स्वंयरोजगाराठी चेतन युवा सेतु या नावने संस्थेची स्थापना करणार.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -मी लोकसभा निवडणुक लढ़विणार होतो.पण काही सामाजिक आणि राजकीय कारणामुळे मी निवडणुक लढ़विणार नसल्याचे डॉ.चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.तसेच या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला किंवा राजकीय पक्षांला पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले.
स्वंयरोजगाराच्या असंख्य संधी या निमीत्ताने युवकांना उपल्ब्ध करून देण्यासाठी चेतन युवा संस्थेची स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगून थायलंडसह आशिया खंडातील अनेक देशाबरोबर कराराद्वारे कोल्हापुरातील फौड्रीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील रहात असून सामाजिक ,कला ,क्रिडा आणि राजकीय क्षेत्रात जोमाने कार्यरत असल्याचे डॉ.नरके यांनी सांगितले.मी गेली 19 वर्षे शिक्षण ,नोकरी आणि उद्योगाच्या निमीत्ताने आशिया आणि युरोप देशात राहून प्रगत शहराची कोल्हापूरची तुलना करता येथे मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे समजले.मात्र कोल्हापूरात राजकीय उदासीनता तसेच अभ्यासाची गरज आणि प्रबोधन या साठी योग्य मार्गदर्शन व पाठ पुरावा नसल्याने आणि दिवसे दिवस वाढ़त असलेल्या समस्या यातुन मार्ग कसा काढ़ता येईल याचा अभ्यासपूर्वक जाणून घेतल्याचे सांगितले.मी लोकसभा निवडणुक लढ़विण्याची तयारी करून गेल्या अडीच वर्षापासून 1150 .गावासह वाड्यावस्त्याचा दौरा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.माझ्या परीने यापुढेही जनतेच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे सांगितले.
डॉ.नरके यांनी कवी.सुरेश भट यांच्या कवितेतुन सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला."विझलो जरी मी आज ,हा माझा अंत नाही ,पेटेन उद्या नव्याने,हे माझे सामर्थ्य नाशवंत नाही ,येतील वादळे खेटेल तुफान,तरी वाट चाललो ..अडथळयाना भिऊन अडखळणे ,पावलांना पसंत नाही ..रोखण्यास वाट माझी,वादळे होती आतुर ..डोळ्यात जरी गेली धुळ,थांबण्यास उसंत नाही .. या आपल्या भावना कवितेतुन व्यक्त केल्या.या कवितेतुन डॉ.नरके यांनी गेल्या दोन वर्षांत त्यांच्या बाबतीत घडलेल्या राजकीय घटनांचा वेध घेत भविष्यातील राजकीय वाटचालीकडे अंगुलीनिर्देश केला.