प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -साळोखेपार्क परिसरात राहणाऱ्या शहनाज राजमहमद मुजावर (वय 60 रा.साळोखेपार्क ) यांचा त्यांचा मुलगा सादिक राजमहमद मुजावर (वय 36 .रा.साळोखेपार्क) याने पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करून खून केला.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला
.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.अधिक माहिती अशी की , सादिक हा साळोखेपार्क परिसरात आपल्या कुंटुबिया समवेत रहात असून तो टेम्पो चालक आहे.त्याचे दोन लग्न झाले असून त्याची पहिली पत्नी इंचलकरंजी येथील असून तिची सोड चिठ्ठी झाली आहे.त्याने दोन वर्षापूर्वी दुसरे लग्न केले असून दुसरी पत्नी सांगली येथील असून ती सध्या माहेरी रहात असून त्याला एक मुलगा आहे.
आज सायंकाळी तो दुसरया पत्नी बरोबर फोन बोलत असताना त्याची आई आणि बहीण यांनी तिच्या बरोबर का बोलतोस म्हणुन वाद घालत असताना त्याने रागाच्या भरात हातात धारदार शस्त्र घेऊन आला असताना या दोघी माय लेकी आपल्या नातेवाईकांच्याकडे पळुन जाऊ लागल्या असताना त्याने पाठलाग करून आईवर वार करून त्यांचा खून केला.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्यांना सीपीआर हलविले.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात येऊन माहिती घेतली.