' मी मतदार : माझी जबाबदारी ' विषयावर पत्रलेखन स्पर्धेला मुदत वाढ इचलकरंजी ता.१५ आगामी


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१५ आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी प्रबोधिनी आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ' मी मतदार : माझी जबाबदारी ' या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदाराला राजा संबोधले जाते.या राजाची नेमकी जबाबदारी काय ? हे सांगणारे २०० ते २५० शब्दांचे पत्र या स्पर्धेसाठी अपेक्षित आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी ही स्पर्धा जाहीर करण्यात आली होती.आता निवडणूक  कार्यक्रम लक्षात घेता या स्पर्धेतील सहभागासाठी मुदत वाढ करण्यात आली आहे.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून पत्रलेखकांनी आपले पत्र १ जून २०२४   पूर्वी 'समाजवादी प्रबोधिनी, ५३६/१८ ,इंडस्ट्रियल इस्टेट, इचलकरंजी ' या पत्त्यावर पाठवावे .या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना समारंभपूर्वक रोख रक्कम व सन्मानपत्राने गौरवले जाणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त पत्रलेखकानी सहभाग घ्यावा असे आवाहन दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post