महानगरपालिकेच्या वतीने महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

    इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज रविवार दि.१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव , भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त स्टेशन रोडवरील डॉ.आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल जवळील अर्धपुतळ्यास उपायुक्त सोमनाथ आढाव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मधील प्रतिमेस मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे आणि सहा. आयुक्त विजय राजापुरे यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने मतदान जनजागृती करणेत आली.

   


  याप्रसंगी प्रकाश मोरबाळे, रवी रजपुते,  विठ्ठल चोपडे, सुभाष मालपाणी, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.एस. जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, शितल पाटील, सदाशिव शिंदे, प्रदीप झमरी, सहा.क्रीडा अधिकारी संजय कांबळे, संभाजी पोवार, प्रतिभा चौगुले, वैशाली पोवार, गौतम कांबळे, महेश बुचडे, अविनाश रंगाटे आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने   स्व.के.एल.मलाबादे यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी  महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दि.१६ एप्रिल  रोजी  माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष स्व.के.एल. मलाबादे यांच्या पुण्यतिथी निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस सहा.आयुक्त विजय राजापुरे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

              याप्रसंगी माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, विधी अधिकारी खदिजा सनदी, अविनाश रंगाटे, सदाशिव शिंदे, प्रदीप झमरी, सदाशिव जाधव, भारत कोपारडे, अशोक कमते, सचिन शेडबाळे आदि उपस्थित होते.



  

Post a Comment

Previous Post Next Post