सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीर संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.३ उत्तम आरोग्य हीच सर्वात महत्वाची संपत्ती आहे. पतंजली योग समितीच्या माध्यमातून होत असलेले सर्वसामान्यांसाठी योग प्रशिक्षण आणि योग प्रशिक्षक घडवण्याचे वस्त्रनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीचे नाव योगनगरी व आरोग्य नगरी म्हणूनही भविष्यात ओळखले जावे. त्यासाठी इचलकरंजीच्या सर्व योगासन केंद्रांना समाजवादी प्रबोधिनीचे सहकार्य गेली वीस वर्षे आहे व ते पुढेही राहील अशी ग्वाही समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी दिली.

ते समाजवादी प्रबोधिनी आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक महिन्याच्या प्रशिक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समाजवादी प्रबोधिनी येथे गेले एक महिनाभर हा प्रशिक्षण वर्ग सुरू होता.यावेळी  चंद्रशेखर (खापणे राज्य प्रभारी महाराष्ट्र पश्चिम ),विजय पोवार (जिल्हा प्रभारी ) यांची प्रमुख उपस्थिती होती.

 विजय पोवार यांनी प्रास्ताविक  केले. तसेच सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरातील सर्व प्रशिक्षणार्थीयांचा निकाल जाहीर केला.

यावेळी प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क वर्ग सुरु करण्याकरीता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पत्र देण्यात आले. प्रशिक्षणार्थीच्या वतीने शिक्षक वर्गास मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचा भेट वस्तु व पुष्प गुच्छ देवुन सन्म्मान करण्यात आला. चंद्रशेख खापणे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.बापूजी पाडळकर (पुणे राज्य प्रभारी ) व भारत स्वाभिमान यानी ऑनलाईन येऊन सर्वांना आशिर्वचन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी सुनिल परीट (जिल्हा संगठन प्रमुख), रविकुमार शर्मा ( जिल्हा सोशल मिडीया प्रभारी) तहसील प्रभारी प्रकाश मोरे, सुनंदा काबरा , सहप्रभारी कृष्णात कांबळे, अजीत चौगुले, विद्याधर पाटील, तसेच सुजाता कोईक, शारदा जासू , शोभाताई पाटील, मनजीभाई पटेल, जगदीश मंत्री ,आंबी , उमाकांत कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश मोरे यांनी सूत्रसंचालन व  रविकुमार शर्मा यांनी आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post