खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी विधानसभा क्षेत्र मेळावे आणि सभाचे सत्र सुरू. पै अमृत भोसले



प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी-( ता.22)= हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात महायुती तर्फे कार्यकर्ता मेळावा आणि सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

 खा माने यांच्या प्रचारार्थ विधानसभा क्षेत्रातील कोरोची तारदाळ खोतवाडी चंदुर कबनूर तसेच शहरातील आरगे भवन, इंदिरा मंगल कार्यालय, गणेश नगर, तोष्णीवाल गार्डन, मराठा मंडळ कार्यालय, आदर्श मंगल कार्यालय, लिंबू चौक भाग आणि अन्य ठिकाणी सभा आणि मेळावे आदीचे नियोजन करण्यात आले आहे. भाजपाचे माजी आमदार सुरेशराव हळवणकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी , ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाशराव दत्तवाडे,मनसेचे रवी गोंदकर तसेच हिंदुराव शेळके, भाजपा शहराध्यक्ष पैअमृतमामा भोसले, तानाजी पोवार, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, शिवसेनेचे भाऊ आवळे ,रिपाईचे श्रीनिवास कांबळे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मिश्रीलाल जाजू रवि रजपुते, अजित मामा जाधव, यांच्यासह घटक पक्षाचे पदाधिकारी आणि प्रभागातील मान्यवर कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत. इचलकरंजी शहरातील प्रभागातून प्रचार यंत्रणा कार्यरत झाली असून घरोघरी मतदाराशी संपर्क करण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे शहराध्यक्ष पै अमृत मामा भोसले यांनी सांगितले.

________

प्रसिद्धी प्रमुख 

उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा मिडिया प्रबंधक लोकसभा मतदारसंघ हातकणंगले

Post a Comment

Previous Post Next Post