लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त करणेत आलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

 ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 

प्रेस मीडिया लाईव्ह :

  इचलकरंजी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ चे अनुषंगाने, ४८ हातकणंगले लोकसभा मतदार संघ अंतर्गत २७९ इचलकरंजी विधानसभा मतदार संघामधील मतदान केंद्रावर नियुक्ती केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे तसेच प्रत्यक्ष ई.व्हि.एम. हाताळणी  (Hands On Trainning)  प्रशिक्षणाचे  आयोजन  डि. के. टी. ई इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यु. कॉलेज, इचलकरंजी  येथे दि. २६ आणि २७ एप्रिल रोजी सकाळी १०  ते १ आणि दुपारी २ ते ५ अशा दोन

 सत्रात सहा.निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित करणेत आले होते. 

 या प्रशिक्षणाच्या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि अप्पर जिल्हाधिकारी तथा ४८ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी उपस्थित राहून निवडणूक कामकाजामासाठी नियुक्त करणेत आलेल्या अधिकारी यांना  ई.व्हि.एम. हाताळणी प्रशिक्षणाचे ठिकाणी  प्रत्यक्ष भेट देऊन  ई. व्हि.एम. हाताळणी बाबत मार्गदर्शन केले.

    सदर प्रशिक्षणास सर्व क्षेत्रिय  अधिकारी तसेच प्रत्यक्ष मतदाना दिवशी नियुक्त करणेत आलेले जवळपास ११४० मतदान अधिकारी उपस्थित होते

             सदर प्रशिक्षण पी.पी.टी.च्या माध्यमातून स्लाईड् शोद्वारे  सहा.निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले आणि महानगरपालिका सहा. आयुक्त तथा प्रशिक्षण नोडल अधिकारी विजय राजापुरे यांनी  उपस्थित अधिकारी यांना प्रशिक्षण दिले.

   तसेच महानगरपालिका उपायुक्त प्रसाद काटकर, उप निबंधक सदाशिव जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने,नायब तहसीलदार संजय काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.


    

Post a Comment

Previous Post Next Post