पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विविध योजनांचे लाभार्थी घरा घरात-- सुरेश हाळवणकर


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी :  जागतिक महामारीतून देशाला बाहेर काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.आज मोदींच्या योजनेचे लाभार्थी घरा घरात आहेत.ते मोदींच्या माघे भक्कम पणे उभे राहत आहेत.असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाअध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ साई मंदिर चौकतील कॉर्नर सभेत सुरेश हाळवणकर बोलत होते. 

सुरेश हाळवणकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःसाठी काहीही केलेले नाही. देशच कुटुंब मानून गेली दहा वर्षे काम करीत आहेत. कोरोना सारख्या महामारीच्या काळात कुटुंबतील एकही व्यक्ती एकमेकांना भेटत नव्हते त्यावेळी आधार देण्याचे काम मोदींनी केले.कोरोनात भारतामध्ये 50 कोटी लोकांचा मृत्यू होईल असे जागतिक संघटनेने सांगितले होते मात्र मोदींनी 130 कोटी लोकांना लस उपलब्ध करून देऊन जनतेला तारण्याचे काम केले.त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी मिळाली आहे.धैर्यशील माने यांना विजयी करून मोदींच्या ऋणातून उतराई होऊया.

अजितमामा जाधव म्हणाले,धैर्यशील माने यांनी अनेक विकासाची कामे केली.

ऋषभ जैन,शशिकांत मोहिते आदींची भाषणे झाली.यावेळी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष हिंदुराव शेळके,प्रदीप धुत्रे,सुकुमार पाटील,इम्रान बागवान,महादेव हाळवणकर आदी उपस्थित होते 

---------__________

प्रसिद्धी प्रमुख 

उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा मिडिया प्रबंधक लोकसभा हातकणंगले

Post a Comment

Previous Post Next Post