महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.21 हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार वाहनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाअध्यक्ष सुरेश हाळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वहिनी यांच्या हस्ते करण्यात आले.


भारतीय जनता पक्षाच्या इचलकरंजी महानगर कार्यालयात  महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाअध्यक्ष सुरेश हाळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वहिनी यांच्या हस्ते फीत कापून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले.शहरातील भागा भागातील प्रचारासाठी रिक्षा तयार करण्यात आली असून त्याचे उद्घाटनही महिला,युवक,कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले."देशासाठी मोदी सरकार,धैर्यशील माने आपला खासदार"असे स्लोगन रिक्षावर लिहिण्यात आले आहे.निवडणूक कार्यालयासमोर कमान उभी करण्यात आली आहे.त्यावर हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे,माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी,स्वर्गीय अनंत दिघे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि धैर्यशील माने यांच्या छबी आहेत.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र माने,शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे,जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक     स्वामी मनसे शहरअध्यक्ष रवि गोंदकर, शिवसेना महिला अध्यक्षा सौ रुपाली चव्हाण वैशालीताई डोंगरे

प्रताप पाटील,आर पी आय चे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले,इचलकरंजी शहर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे.माजी उपनगराध्यक्ष  मिश्रीलाल जाजू, अजितमामा जाधव,उदय बुगड तानाजी पोवार,रवि रजपुते, मा नगरसेवक चंद्रकांत शेळके 

प्रकाश पाटील,मनोज हिंगमिरे मनोज साळुंखे, युवराज माळी प्रदीप धुत्रे, रवि लोहार ,सरचिटणीस बाळकृष्ण तोतला दिपक पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड आदी भाजपा,शिवसेना, राष्ट्रवादी,आर पी आय, मनसे आदी मित्र पक्षाचे  पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

__________

प्रसिद्धी प्रमुख 

उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा मिडिया प्रबंधक लोकसभा हातकणंगले

Post a Comment

Previous Post Next Post