प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी -(ता.) ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपाने स्थापन केलेल्या आघाडीच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजय करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करावे. आणि पंतप्रधान मोदी यांच्या विकास कामास साथ करा असे आवाहन प्रदेश भाजपा उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी येथे केले.
मेळाव्यात प्रारंभी जिलानी टाकवडे यांनी स्वागत केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक कडोलकर यांनी प्रास्ताविक केले. सुरेश हाळवणकर पुढे म्हणाले, सबका साथ आणि सबका विकास या तत्त्वाने स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, आणि रेशन मधून धान्य देताना जात धर्म पक्ष पंथ बघितला नाही. आता ही लोकसभेची निवडणूक असून भारत शक्तिशाली देश कसा करणार? हे ठरवणारी आहे. पण काँग्रेस सह विरोधक गटारी रस्ते आणि पाणी आपले गाव पाठीवरचे विषय मांडून दिशाभूल करत आहेत. प्रवासी रेल्वेवर आणि काश्मीरात सैनिकावर दगडफेक करणाऱ्या अतिरेक्यांची हिंमत होत नाही. मोदींच्या स्पष्ट परराष्ट्र नीतीमुळे ते जगात एक नंबरचे नेते बनले आहेत . भारतातील 25 कोटी लोकांची गरिबी हटली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. आणीबाणीतील राजबंदीना चालू असलेली पेन्शन उद्धव ठाकरे काळात बंद झाली होती. ती आता पुन्हा चालू केलेली आहे. संगायो लाभार्थीच्या
पेन्शनमध्ये वाढ होणार असून वयश्री योजनेसाठी नाव नोंदणीचे काम संघटनेतर्फे सुरू करा. आणि योग्य त्या माणसापर्यंत सरकारी योजनांचा लाभ द्या असेही त्यांनी आवाहन केले
तर इचलकरंजी ते ज्येष्ठ डॉक्टर एस.पी.मर्दा यावेळी म्हणाले, नरेंद्र मोदींचे नेतृत्व फार महत्त्वाचे असून जगाच्या पाठीवर देशाला मोठे स्थान मिळवून दिले आहे. सर्वसामान्यांच्या हे लक्षात येत नाही. ते जगातील एक नंबरचे नेते आहेत. असे सांगीतले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे शहराध्यक्ष ऍड अनिल डाळ्या यांनी विविध योजनांची माहिती दिली. आणि लाभार्थीना सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. कार्यक्रमात यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग म्हातुकडे, उपाध्यक्ष वसंत पोवार, दौलत पाटील, आदीची भाषणे झाली.शेवटी आभार यांनी मानले. कार्यक्रमास रेखा कदम, लतिका पवार, शशिकला पाटील, यमुना पाटील तसेच प्रल्हाद सूर्यवंशी,महादेव बडवे, दत्ता जोशी, प्रमोद मुळे, सुरेश पाटील, अशोक तारळेकर, तमन्ना तेली, सिताराम ओझा, विजय देवळे, नारायण आपटे, संपत मालू, विष्णू वाळवेकर आदी सह मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक हजर होते.
==============.
प्रसिद्धी प्रमुख
उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा हातकणंगले लोकसभा मिडिया प्रबंधक