आरोपी शंकर अर्जुन साळुंखे यास अटक त्याच्याकडून गुन्हयातील गेलेला संपूर्ण 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रसायनी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 96/2024 भादवी 454, 457, 380 या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनी पोमन व पथक करत असताना सायबर सेलचे मदतीने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपी नामे शंकर अर्जुन साळुंखे वय 18 वर्ष राहणार वाशिवली आदिवासी वाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्हयातील गेलेला संपूर्ण 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
1)14 विविध कंपनीचे मोबाईल .
2)एचपी कंपनीचा01लॅपटॉप.
असा एकूण 02 लाख 36 हजार रुपये किमतीच्या मालाची रिकव्हरी करण्यात आलेली आहे.
उघडकीस आलेले गुन्हे--
1) रसायनी गु.र.96/2024IPC 380,457,454.
2)रसायनी . गु र.101/2024
IPC 454,457,380
3) किनवली पोलीस स्टेशन 79/2024IPC 380,454,457.जिल्हा(ठाणे ग्रामीण) तसेच आरोपीतवर यापूर्वी रायगड जिल्ह्यात व इतर ठिकाणी विविध 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत पुढील अधिक तपास रसायनी पोलीस ठाणे करत आहे.
कार्यवाही पथक -सपोनी/ पोमन, Asi राजेश पाटील ,Hc संदीप पाटील, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे, यशवंत जेमसे यांनी केला आहे.