प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :सुनील पाटील
बॉलीवूड चा दबंग खान अर्थात सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराबाहेर पहाटे पाच वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केलाय. या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय.
गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या मिळत आहेत. यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ देखील करण्यात आलीये. मात्र, असे असताना देखील सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झालाय. आता याच गोळीबार प्रकरणात अत्यंत मोठी माहिती ही पुढे येताना दिसत आहे.
सलमान खान ज्या गॅलरीत येऊन आपल्या चाहत्यांना भेटतो, त्याच गॅलरीच्या भोवती हा गोळीबार झाल्याचे कळत आहे. गोळीबाराच्या 4 ते 5 राउंड फायर झाल्या आहेत. अगोदर असे सांगितले जाते होते की, सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार झाला. मात्र, तसे नसून सलमान खानच्या गॅलरीच्या आसपास हा गोळीबार करण्यात आलाय.
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. पहाटे हा गोळीबार झाल्यानंतर घरातील जवळपास सर्वच सदस्य हे घरात असल्याचे सांगितले जातंय. आता या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास हा केला जातोय, या प्रकरणात मोठे खुलासे पोलिसांकडून केले जाऊ शकतात.
या गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ हा पुढे आलाय. दोनजण दुचाकीवर दिसत आहेत. मात्र, या दोनजणांचा चेहरा हा पूर्ण झाकलेला दिसतोय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे आरोपी मुंबईतील नसून राजस्थान किंवा हरियाणा भागातील असावीत. या प्रकरणात चार सुरक्षारक्षकांचे बयान पोलिसांकडून घेण्यात आले असून पुढील चाैकशी सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ज्या बंदुकीने गोळीबार करण्यात आला ती 7.6 बोअरची बंदूक आहे. लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीकडूनच हा गोळीबार केला असावा असा अंदाज काढला जातोय. लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून सतत सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी ही मिळत आहे. मात्र, लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीकडून अजूनही या प्रकरणाची जिम्मेदारी घेण्यात नाही आली.