प्रेस मीडिया लाईव्ह :
बेडकिहाळ : कै बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकिहाळ बेळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली करन्यात आला.
सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये चिकोडी, बोरगांव, बागलकोट, विजयपुर येथील वधु वर होते. त्यांना सामुदायिक विवाह सोहळ्यात शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मंगळसूत्र, जोडवी, शालु, मुलाला ड्रेस उपरणी संसार संसार सट देण्यात आले. हे सर्व संस्थेच्या वतीने मोफत वधु वरांना देवुन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अक्षता टाकून त्यांना शुभाशिर्वाद देण्यात आले.
प्रथम कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करन्यात आली. प्रा.एम डी पाटील गडहिंग्लज, डॉ गुणवंत मंजु फिल्म डायरेक्ट बेंगळुरू, शिवानंद बिजले ग्रा पं चेअरमन बेडकिहाळ, डॉ अशोक ठोमके सामाजिक कार्यकर्ते इचलकरंजी तसेच सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करन्यात आली. त्यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन दत्तात्रय पाटील एस डी कार्पोरेशन चेअरमन कोल्हापूर, डॉ जयकर गवाळे शिक्षक सामाजिक कार्यकर्ते पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले.
त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्रकाश कदम सर आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ही गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहे. रक्तदान शिबिर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणे, व्रुक्षारोपण करणे, अनेक गरजु विद्यार्थाचे शालेय फी भरणे, संगणक प्रशिक्षण मोफत देणे, अनाथ आश्रमाला भेट देऊन अन्नधान्याची व्यवस्था करणे, कवी संमेलन आयोजित करणे, मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे, अनेक गरजु महिलांना साड्या वाटप करणे, अनेक समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी जणांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, तसेच सर्वात मोठा सामाजिक उपक्रम म्हणजे मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे, असे अनेक सामाजिक उपक्रम ही संस्था राबवत असते. असे त्यांनी ट्रस्टच्या कार्याचा आढावा सांगितला.
तसेच संतोष दोडमणी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की शिंगाडे ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे. डॉ विक्रम शिंगाडे सर यांच्या सामाजिक कार्याचा सर्वांनी प्रेरणा घ्यायला हवी असे ते म्हणाले.
प्रा.एम.डी पाटील म्हणाले की मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे एवढे सोपे नाही. हा खुप मोठा सामाजिक उपक्रम आहे. शिंगाडे सरांच्या सारखे कार्य सर्वांनी करावे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ सुमित्रा पाटील म्हणाल्या की शिंगाडे सरांचे सामाजिक कार्य हे खुप कौतुकास्पद आहे. म्हणून मी त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये सहभागी असते. त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन नेहमीच खुप सुंदर असते. डॉ विक्रम शिंगाडे हे माझे मोठे बंधु म्हणुन मला नेहमीच त्यांचे कौतुक वाटते असे त्या म्हणाल्या.
त्यावेळी दिलप्रीत सिंग यशस्वी उद्योजक इचलकरंजी, डॉ शंकर पाटील सामाजिक कार्यकर्ते बेळगाव, अशोक झेंडे ग्राम विकास अधिकारी बेडकिहाळ, आर जी डोमणे,मलगोंडा पाटील,बाबु नारे, राजु पाटील, ॲड सुदर्शन तम्मणवर, ॲड निरंजन कांबळे,प्रा डी एन दाभाडे शेती विचार मंच अध्यक्ष बेडकिहाळ, तात्यासाहेब केस्ते , बाळासाहेब शिंदे, डॉ शोभा महाजण, मंजुनाथ कांबळे,अजित कांबळे, सुकमार शिंगे, सुधाकर माने,तसेच पत्रकार असे अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम दि 17 रोजी देशभक्त रत्नाप्पान्ना कुंभार सभागृह, बी एस कंपोजिट कॉलेज बेडकिहाळ येथे अति उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अजित कांबळे यांनी मानले.