काळाखडक येथील बेकायदेशीर प्रकल्प , सर्व्हे रद्द करा - अपना वतन
प्रेस मीडिया लाईव्ह :
काळाखडक,वाकड सर्व्हे न १२४/१ पैकी या क्षेत्रामधील झोपडपट्टी धारकांचा एसआरए योजनेमधील बोगस नोंदी , बेकायदेशीर गोष्टी , यांसारख्या अनेक त्रुटी असल्याकारणाने झालेला बेकायदेशीर सर्व्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक २१/०३/२०२४ रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे येथील कार्यालयावर संविधान मोर्चा काढण्यात आलेला होता .
यावेळी काळाखडक , वाकड शेकडो नागरिक उपस्थित होते . त्यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ नुसार एस आर ए ची कायदेशीर प्रक्रिया राबवणे अपेक्षित आहे . परंतु विकसक, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मधील अधिकारी संगनमत करून स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता , लोकांची संमती नसताना त्यांची दिशाभूल करून तिऱ्हाईत व्यक्तींमार्फत संमती भरून घेत आहेत. त्यामुळे काळाखडक येथे झालेला बेकायदेशीर सर्व्हे रद्द करण्यात यावा .यावेळी एस आर ए चे मुख्याधिकारी निलेश गटने यांनी निवेदन स्वीकारले. त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
अपना वतन संघटनेने दिलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या .
१) दिनांक २८/०३/२०२४ रोजी , सण २०१२ च्या जुन्या व कालबाह्य समंती पत्राच्या आधारे , स्थानिक नागरिकांचा विरोध असताना , पोलीस बळाचा वापर करून व गुंडाना हाताशी धरून केलेला काळाखडक झोपडपट्टी येथील नियमबाह्य व बेकायदेशीर सर्व्हे रद्द करा . तसेच सण २०१२ मध्ये जय इंटरप्राइजेस यांनी दाखल केलेला कालबाह्य प्रस्ताव दफ्तरी दाखल करा .
२) काळाखडक झोपडपट्टी येथील गोरगरीब , कष्टकरी , दलित मागासवर्गीय निरक्षर महिलाना दमदाटी करून , भीती दाखवून तसेच संजय गांधी निराधार योजना , पेन्शन च्या नावाखाली फ़सवून दिशाभूल करून , बनावट संमतीपत्र दस्तऐवज बनवून शासनाची व जनतेची फसवणूक केलेली आहे . त्यामुळे संबंधित विकसक यांचेवर भारतीय दंड संहिता कलम १८६ आणि भारतीय पुरावा अधिनियम १८७२ व इतर कायद्यांमधील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा .
३) सर्व्हेक्षक , तहसीलदार , नायब तहसीलदार , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांनी बनावट दस्तऐवज च्या आधारे , चुकीची व खोटी पात्रता यादी बनवल्या प्रकरणी संबंधितांची सखोल चौकशी करून कायद्यांमधील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ यावे .
सदर आंदोलनावेळी अपना वतन संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे , आझाद समाज पार्टीचे ऍड क्रांती सहाणे ,रुपालीताई कांबळे , सचिव दिलीप गायकवाड ,महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , संघटक हमीद शेख , जितेंद्र जुनेजा , प्रकाश पठारे , तौफिक पठाण , अब्दुल अजीज शेख , विशाल गायकवाड , विकास पडागळे , कयूम पठाण , यांसह काळा खडक येथील शेकडो नागरिक उपस्थित होते .