चौथ्या मजल्यावरुन गणपतीची मुर्ती खाली आणताना लिफ्टची रोप वायर तुटल्याने एक जण ठार तर एक जखमी.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-संत गोरा कुंभार वसाहत येथे लिफ्टची रोप वायर तुटल्याने लिफ्ट मधून पडून भगवान नामदेव कांबळे (वय 48.रा.विक्रमनगर ,मुळ गाव पासार्डे ता.करवीर ) हे गणपतीची मुर्ती चौथ्या मजल्यावरुन खाली आणताना लिफ्टची रोप वायर तुटल्याने लिफ्ट मधून खाली पडले असता त्यांना बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले , तर एक जण गंभीर जखमी . असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकित झाली आहे. अधिक माहिती अशी की,मयत भगवान कांबळे हा संत गोरा कुंभार येथे गेल्या दोन महिन्यापासून बाजीराव कुंभार यांच्या कडे हाता खाली काम करीत होता.आज सकाळी अकराच्या सुमारास चौथ्या मजल्यावरून गणपतीची मुर्ती खाली आणताना तो आणि गुहागर येथील कामास असलेला असे दोघे जण लिफ्ट मधून खाली येत असताना लिफ्टची वायर तुटल्याने ही दुर्घटना घडली.

नातेवाईकांनी भगवान बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचे उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .भगवान पडेल ते काम करीत होता.तो विवाहित असून दोन मुले आहेत.एक मुलगी दहावीत शिकत असून मुलगा पहिलीत शिकत आहे.त्याला तीन भाऊ आणि एक बहिण आहे.त्यांना भजनाचा छंद असून ते साई भजनी मंडळात होते. त्याच्या अशा निधनाने परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे.सीपीआर परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post