प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -इंचलकरंजी परिसरात असलेल्या सीता ज्वेलर्स खरेदीच्या निमीत्ताने जाऊन चोरी करणारा नबीजान शहाजहान इराणी (वय.50रा.राजीव गांधी नगर,जयसिंगपूर).याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्याच्या ताब्यातील एक लाख किमतीचे सोन्याचे बदाम जप्त केले.
अधिक माहिती अशी की,इचलकरंजीत सीता ज्वेलर्स या सराफी दुकानात 13 फ़ेब्रु.24 रोजी अनोळखी व्यक्तीने खरेदीच्या निमीत्ताने येऊन त्या दुकानातील कर्मचारी यांना बोलण्यात गुंतवून 17 gm.वजनाचे सोन्याचे बदाम चोरुन नेले होते.याबाबतची तक्रार दुकान मालकांने शिवाजी पोलिस ठाण्यात दिली होती.या गुन्हयांचा तपास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक करीत असताना या गुन्हयातील चोरटा जयसिंगपूर येथे चोरीतील दागिने विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इंचलकरंजी येथे सीता ज्वेलर्स या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली अ सता त्याला अटक करून पुढ़ील तपासासाठी शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर सहा.पोलिस निरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.