पुणे शहरात सार्वजनिक मालमत्ता विद्रूपिकरण विषयात भाजप वर गुन्हा दाखल करावा - शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहर हे सांस्कृतिक तसेच विद्येचे माहेरघर म्हणून राज्यात प्रचलित आहे , स्वच्छ सर्वेक्षणात तसेच आत्ताच झालेल्या G20 परिषदेत पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील भिंती सुशोभीकरण केल्या होत्या , परंतू भारतीय जनता पक्षाच्या वतीने या आणि अनेक भिंतींवर राजकीय जाहिरातबाजी करुन स्वच्छ सर्वेक्षणात पुणेकरांची मान खाली घालविण्याचा प्रकार केला आहे. आणि शहर विद्रुपीकरण केले आहे. तसेच विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागात भाजपच्या वतीने गल्लोगल्ली बॅनर लाऊन शहर विद्रूपीकरणात अजुन हातभार लावला जात आहे.
या विद्रुपीकरणाचा शिवसेना पुणे शहराच्या वतीने आम्ही निषेध करत पुणे महानगर पालिका प्रशासनाने तत्परतेने सदर शहर विद्रुपीकरण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यां विरोधात पालिका अधिनियम १९४९ आणि महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम नुसार गुन्हे दाखल करावेत. अन्यथा शिवसेना पद्धतीने आम्हास आंदोलन करुन अथवा कायदेशीर मार्गाने आपणास आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देऊ असे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पुणे मनपा उपायुक्त माधव जगताप यांची भेट घेउन पुणे शहरातील लाखो रू खर्च करून स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत सुशोभीकरण केलेल्या भिंती विद्रुपिकरण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर सुध्दा गुन्हा दाखल करावा असे निवेदन दिले. याप्रसंगी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, राजेश पळसकर, आनंद गोयल ,मा नगरसेवक पृथ्वीराज सुतार, अविनाश साळवे, बाळा ओसवाल, विभागप्रमुख प्रविण डोंगरे, अजय परदेशी, नंदू येवले, मुकुंद चव्हाण, नितीन रावळेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते .