प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- दुचाकीवरुन पाठलाग करत आलेल्या तिघां जणानी कोल्हापूर-राधानगरी रोड परिसरात असलेल्या हॉस्पिटल समोर दोघां जणांना रस्त्यात अडवत शिवीगाळ करुन त्यातील एकाने डोक्यात तलवारीने वार केला.ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली असून या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तलवार हल्यात जखमी झालेला शिवराज चंद्रकांत बंडगर (वय 24.रा.वाल्मिकी आंबेडकर आवास योजना वसाहत को.) आणि त्याचा मित्र सुजल हे दोघे शुक्रवारी रात्री दुचाकीवरुन घरी जात असताना त्यांच्या परिचयाचे असलेले संशयीत आकाश गस्ते (रा.लक्षतीर्थ ),रवी भोसले (रा.बोंद्रेनगर) आणि अमित कांबळे (रा.कंळबा) या तिघांनी पाठलाग केला होता.
----------------------------------------------------------------
गॅस गळतीत भाजुन जखमी झालेले दिर -भावजयचा मृत्यु.
कोल्हापुर- हातकंणगले तालुक्यातील अंबप येथे बुधवारी घरात ग्यस गळतीने भडका उडुन दिर शंकर आनंदा लोकरे (62) आणि भावजय सजाक्का अशोक लोकरे (59.दोघे रा.अंबप) हे दोघे भाजुन जखमी झाले होते.त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात उपचार चालू होते.दरम्यान शुक्रवारी दिर शंकर लोकरे यांचा उपचार चालू असताना मृत्यु झाला होता.त्या नंतर रविवारी दुपारी भावजय सजाक्का अशोक लोकरे यांचा मृत्यु झाला.या दोघांच्या मृत्युने अंबप गावात हळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चोकीत झाली आहे.