प्रेस मीडिया लाईव्ह :
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस . आठवले व महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मिराताई वहर यांनी महाराष्ट्र राज्य सह मुख्य निवडणुक अधिकारी मनोहर पारकर मंत्रालय मुंबई यांची भेट घेतली व देशातील आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम मशीन द्वारे न घेता बॅलेट पेपर वरच निवडणुका घ्याव्यात अशी आग्रही मागणी केली.
या दरम्यान आंदोलक व सह मुख्य निवडणुक अधिकारी पारकर यांच्यात संबंधीत ईव्हीएम मशीन वर कायम स्वरूपी बंदी घालावी अशी चर्चा करण्यात आली यावेळी मनोहर पारकर यांनी मागणीची दखल घेऊन केन्द्रीय निवडणुक आयोगा कडे आपली मागणी लेखी पत्राद्वारे पाठवले जाईल अशी ग्वाही दिली