प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
दिनांक 10/3/24 रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली. त्यासाठी 5000 लिटरची टाकी, पाण्याचा पंप, टाकीच्या शेडचे काम करून दिले व महिला दिनाचे औचित्य साधून सदरचे उदघाटन महीलांच्या हस्ते पार पाडले
त्याच दिवशी वृक्षारोपण सुद्धा करुन दुग्धशर्करा योग साधला. सदर कार्यक्रमासाठी, श्री दिनेश पवार, श्री वसंत पाटील, श्री संजय गोंधळी, श्री ऊमेश ठोकळ,श्री रमेश राऊत, श्री दिलीप गायकवाड, श्री जगदीश गोडीवले, सौ मानसी जोशी, सौ चित्रा तांबोळी, सौ ललिता शिगवण, सौ माई पाटील, सौ ऊज्वला चव्हाण तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री बखर सर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समीर आंबवणे (सर) यांनी केले,