शेकाप वाले लावणार दम उरण में अब की बार प्रितम

 

प्रेस मीडिया लाईव्ह  :

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

पनवेल तालुक्यातून शेतकरी कामगार पक्षाची घसरण सुरु आहे. मात्र आता पुन्हा एकदा प्रितम म्हात्रे यांच्या रूपाने संजीवनी मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. उरणमध्ये शेकापक्षाचा आमदार निवडून आणण्याचा निश्चय प्रितम म्हात्रे यांच्या समर्थकांनी केला असून तशा प्रकारचे मॅसेज आता सोशल मिडियावर फिरु लागले आहेत.

मागील आमदारकीच्या निवडणुकीत पनवेल मतदार संघातून प्रितम म्हात्रे निवडणूक लढविणार असल्याची चिन्हें निर्माण झाली होती. त्यावेळी सुध्दा बॅनरवर मागे विधानसभेचे फोटो लावण्यात आले होते. परंतु त्यावेळी काही कारणास्तव त्यांनी माधार घेतली होती. मात्र आता प्रितम म्हात्रे यांचे नाव उरणमध्ये चांगलेच  चर्चेत  आहे,

प्रितम म्हात्रे हे तरुण नेतृत्व आहे. तसेच सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. कार्यकत्यांच्या मागणीचा त्यांना पावेळी गांभियनि विचार करावा लागणार आहे. कारण कार्यकर्ते हे त्यांना उरणचा भावी आमदार माणून पाहत आहेत. उरणला एक तरुण तडफदार आमदार मिळावा हिच तरुणांची इच्छा दिसून येत आहे.

सोशल मिडीयावर भावी आमदार म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे

भावी आमदारआणि हा ट्रेण्ड सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून बाला तरुणांची चांगलीच पसंती मिळत आहे. आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आत्ता लोकसभा निवडणूक जिंकायची मग प्रितम म्हात्रे यांना आमदार करायचे असा निर्धार शेकाप कार्यकत्यांनी केला आहे. उरण मतदार संघात शेकापची मतदारसंख्या जास्त असल्याचा दावाही करण्यात येत


आहे. तसेच शेकाप हा आघाडीचा घटक पक्ष म्हणून उरण मतदार संघावर शेकापची दावेदारी मजबूत मानली जात आहे. प्रितम म्हात्रे हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत, परंतु त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणच जास्त केल्याचे पहावयास मिळते, याचा प्रत्यय इरशाळवाडी वेवील दुर्घटनेत दिसून आला, या घटनेनंतर त्यांनी जी आपदग्रस्तांना मदत केली ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यावेळी विरोधकांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच भाविकांना एकाच ठिकाणी आपल्या आवडत्या देवतांचे दर्शन घेता याचे यासाठी त्यांनी नडाल येथे पंचायतन मंदिर बांधले.

त्यांचे मुळ गाव हे उरण तालुक्यातील कोपर असल्याने तेथूनही त्यांच्या नावाला चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आजोळ देखील बेशी दिघोडे असल्याने तेथे शैक्षणिक कार्यात त्यांनी केलेल्या भरीव कामगिरीचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. बाराही महिने सामाजिक काम करणारा तरुण असे म्हटल्यास उरण मध्ये आमदारकीसाठी प्रीतम म्हात्रे यांच्या वावगे ठरू नये तरुणांमध्ये त्यांची असलेली

क्रेस. शांत संघमी स्वभाव ही त्यांच्য়া व्यक्तिमत्वाला वैशिष्टे सर्वांनाच भावतात. त्यांनी उरण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केलेले आहे. हे कार्य त्यांनी अगदी निस्वार्थीपणे केलेल आहे. एक तरूण चेहरा म्हणून सर्व पक्षीय युवकांची त्यांना पसंती असून उरण मतदारसंघात त्यांची वाढलेली रेलचेल हे विधानसभेसाठी उरणमधून प्रितम म्हात्रे हे उमेदवार असणार पावर शिक्का मोर्तथ झाल्याचे  दिसून येते.

Post a Comment

Previous Post Next Post