पुणे लोकसभेसाठी लोकसेना कडून असलम बागवान


प्रेस मीडिया लाईव्ह  :             

पुणे : लोकसेना हा पक्ष लोकसभा निवडणूकीसाठी राज्याच्या ४८ जागेपैकी दहा जागांवर उमेदवार निवडणूक मैदानात उतरवणार आहे .पुणे लोकसभा मतदारसंघातून सामाजिक कार्यकर्ते आणि  इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक  असलम इसाक बागवान यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे ,अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार(बीड) यांनी रविवारी पुण्यात पत्रकाद्वारे दिली . 

 असलम बागवान हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते असून इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपच्या माध्यमातुन पुण्यात सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत.त्यांनी अनेक सामाजिक आंदोलन केलेली  आहेत.धोरणात्मक मुद्यांवर  कार्य ,सी ए ए विरूद्ध पुर्ण भारत दौरा ,पंचायत राज करीता १२०० किमी पोचमपल्ली तेलंगणा ते वर्धा पदयात्रा, पुणे ते मुंबई ३ वेळा  सी एए, मुस्लिम आरक्षण, किसान कायदे विरूद्ध पदयात्रा,मौलिक आधिकार करीता पुणे ते दिल्ली सायकल यात्रा अशा अनेक सामाजिक आंदोलनात त्यांचे योगदान आहे.कोंढवा भागातील नागरी प्रश्नांसाठीही त्यांनी लढे दिलेले आहेत.

त्यांचे सामाजिक कार्य पाहून लोकसेनाने त्यांना पुणे येथून उमेदवारी दिली आहे व उर्वरित मतदार संघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा लवकरच करणार आहोत,अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिली आहे.

                                


Post a Comment

Previous Post Next Post