जेष्ठ पत्रकार श्री. निरंजन टकले यांची काँग्रेस भवनला भेट.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :


पुणे :  आज दि. ३० मार्च २०२४ रोजी जेष्ठ पत्रकार आणि लढाऊ कार्यकर्ते लेखक श्री. निरंजन टकले यांनी काँग्रेस भवनला भेट दिली . यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. मोहन जोशी, शिवसेनेचे श्री. गजानन थरकुडे, श्री. संजय मोरे, श्री. संग्राम खोपडे उपस्थित होते.

     

भारत जोडो अभियानचे समन्वयक श्रीप्रशांत कोठाडिया यांनी या बैठकीचे आयोजन केले व श्रीसंदिप बर्वेॲडसंदिप ताम्हणकर आणि भारत जोडो अभियानचे इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    

 यावेळी श्रीनिरंजन टकले यांनी नाशिक शहरात केलेले वेगवेगळे उपक्रमबुथ कार्यकर्ता प्रशिक्षणकोपरा सभा कार्यकर्ता प्रशिक्षण६००० सोशल मिडिया वॉरीयर यांची टिम बांधणे याचे अनुभव सांगितलेतसेच भाजपासंघ आणि मोदी सरकारचा खोटा प्रचार प्रत्येक ठिकाणी खोडून काढण्याची रणनिती विषद केली.

     

यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘पुण्यात महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी श्रीनिरंजन टकले यांचा एक तपशिलवार प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जाईल आणि पुण्यातही अशीच टिम उभी केली जाईल असे नियोजन आहे असे सांगितले.’’

    

 सर्व उपस्थितांचे आभार मानूर श्रीनिरंजन टकले यांचा शाल आणि तिरंगी पट्टी देऊन स्वागतपर सत्कार केला.

Post a Comment

Previous Post Next Post