प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यातील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यांची काँग्रेसचे पुण्याचे लोकसभा उमेदवार श्री. रविंद्र धंगेकर यांच्याशी संवाद बैठक पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुणे येथे आज संपन्न झाली.
सदर बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भांत महत्वाच्या सूचना इंडिया फ्रंट आघाडीतील प्रमुखांकडून करण्यात आल्या.
महाविकास आघाडी, इंडिया आघाडी, भारत जोडो अभियान, यांची ध्येय धोरणे, संविधानाप्रती निष्ठा, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाची भुमिका ठेऊन सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन भारतीय जनता पक्षाचा आपण निश्चित पराभव करू अशी खात्री व्यक्त करण्यात आली.
यावेळी उमेदवार श्री. रविंद्र धंगेकर यांनीही सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक भूमिका घेऊन आणि प्रचाराची आखणी करू आणि हुकूमशाही धर्मांध शक्तींचा पराभव करू असा या बैठकीमुळे आत्मविश्वास वाढला असल्याचे सांगितले.
या बठैकीस सामाजिक संघटनचे सुभाष वारे, अजित अभ्यंकर, संदिप ताम्हनकर, वसंत पवार, दत्ता पाकिरे, अन्वर राजन, संदिप बर्वे, इब्राहिम खान, अशोक तातुगडे, संदेश दिवेकर, दिपक पाटील, लता भिसे, अरविंद जक्का, प्रकाश पवार, आल्हाद पासलकर, जांबुवंत मनोहर, अनिस अहमद, प्रकाश भारद्वाज, प्रशांत कोठाडिया, ॲड. मोहन वाडेकर, किरण मोघे, निलम पंडित, अशोक साळवी, रंजना पासलकर, वसुधा जोशी, नितीन चव्हाण, सविता सोनवणे, वंदना गिर, एकनाथ पाठक, दत्तात्रय जाधव, स्मिता हेमलता, किरण पोकळे, यांसह महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.