आम आदमी पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी धनंजय बेनकर यांची नियुक्ती



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : आम आदमी पक्षाचे  महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील व प्रदेश सह प्रभारी गोपाल इटालिया यांनी आज बेनकर यांची नियुक्ती जाहीर केली.

पक्षाचे पुणे शहर प्रवक्ते म्हणून उत्कृष्ट काम केले आहे.  तसेच पक्षाच्या माध्यमातून पुणे शहर व परिसरातील विविध नागरी समस्यांवर जन आंदोलने उभारली. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुणे शहर निवडणुकी साठी हि नियुक्ती महत्वाची मानली जाते बेनकार हे धायरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्य म्हणून तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून  सिंहगड रोड धायरी आंबेगाव परिसरात विविध उपक्रम राबविले आहेत. 

 नवनियुक्त अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, आम आदमी पक्षाचे संस्थापक  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर व परिसरात पक्षाची संघटना बांधणी करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय   मेळावे शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post