प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे: ( मोहम्मद जावेद मौला)
पुणे : दि.०५ मार्च २०२४ रोजी पूना कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे अंजुमन खैरूल इस्लाम संस्थेचे सचिव श्री. हानी अहेमद फरीद व विश्वस्त श्री हनीफ लकडावाला (मुंबई ) आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ.इक्बाल शेख यांनी करून दिला. पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ.आफताब अन्वर शेख यांनी महाविद्यालयात वर्षभर झालेल्या शैक्षणिक विकासाचा व प्रगतीचा आढावा घेऊन भविष्यातील योजनांची माहिती दिली तसेच विविध स्पर्धा मधील विजेत्या खेळाडूंची व संशोधकांची माहिती देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रमुख पाहुणे व संस्थेचे सचिव डॉ. हानी अहेमद फरीद यांनी मनोगतात सांगितले की मुलांनी आपल्या मधील सुप्त गुणांचा विकास करून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश संपादन करुन देशाचे नाव उज्वल करावे.
संस्थेचे विश्वस्त डॉ. हनीफ लकडावाला यांनी सांगितले की प्रयत्नांशिवाय यश संपादन करता येत नाही महाविद्यालयात विविध भाषांची संशोधन केंद्र निर्माण करून मुलांमध्ये मूल्य शिक्षण रुजवावे.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अंतर राष्ट्रीय, राष्ट्रीय ,राज्यस्तरीय व अंतर महाविद्यालयीन स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना तसेच युवा महोत्सवातील सहभागींना क्रीडा शिष्यवृत्ती , पारितोषिकं व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला उपप्राचार्य मोईनुद्दीन खान प्रा. इम्तियाज आगा पर्यवेक्षिका प्रा सौ.नसीम खान क्रीडा संचालक डॉ. अयाज शेख क्रीडा शिक्षक प्रा.असद शेख व प्रा. इम्रान पठाण सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी एन.सी.सी. एन.एस.एस. स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेख हुस्नोंद्दीन प्रा. शाहीन कुरेशी व डॉ.फाजील शरीफ यांनी केले. जिमखाना कमिटी उपाध्यक्ष डॉ. मुशर्रफ हुसेन यांनी आभार मानले.
Tags
पुणे